STORYMIRROR

Kiran Ghatge

Inspirational

3  

Kiran Ghatge

Inspirational

झालं गेलं विसरून जाऊ

झालं गेलं विसरून जाऊ

1 min
354

झालं गेलं विसरून जाऊ

एकदा आपण भेटून घेऊ

    किती असला मनात राग

    एकदा सारा गिळून घेऊ

मनीं दाटल्या वेदना सार्‍या

एकदा आपण वाटून घेऊ

    होणार नाही पुन्हा भांडण

    एकदा बसुन ठरवुन घेऊ

अस्तव्यस्त या संसाराला

एकदा सार सावरून घेऊ

    चुकले असेल माझे तुझे 

    एकदा सारे जुळवून घेऊ 

विरहात या एकटे आपण

एकदा प्रेमात भिजुन घेऊ

    आठवांच्या मधुर क्षणात 

    एकदा परत रमुन घेऊ

काय खरे खोटे जीवनाचे 

एकदा मनसोक्त जगून घेऊ 

    झालं गेलं विसरून जाऊ 

    एकदा आपण भेटून घेऊ


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Inspirational