STORYMIRROR

Dinesh Kamble

Romance

3  

Dinesh Kamble

Romance

झाला दूर वियोग प्रिये

झाला दूर वियोग प्रिये

1 min
203

तू मदनाची मंदाकिनी 

तू मेनका तुच उर्वशी 

ये अशी समिप तू प्रियतमा 

घे डाव्या हाताची तुला उशी 


नको लाज बाळगू प्रिये 

नको इतक्यात लोटू दूर तू 

हुरहुर माझ्या मनाचीं 

सखे आता करायला हवी दूर तू 


दिवे सारे मंद झाले 

शुभ्र चांदण्याची सजली फौज 

तोडूनिया बंधने लाजेची

आजच्या क्षणाला करूया मौज


घेऊनिया तुला बाहुपाशात 

वाटे लुट लुटावी तव यौवनाची 

गोऱ्या तुझ्या गालावर आली

सखे का लाली ती मदनाची


घडी ही मधूर मिलनाची 

झाला दुग्ध शर्करा योग प्रिये 

दिले तुला आलिंगन मी 

झाला दूर सारा वियोग प्रिये 


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Romance