STORYMIRROR

Rajendra Udare

Inspirational

3  

Rajendra Udare

Inspirational

झाडं

झाडं

1 min
269

अंगण जंगल डोंगर 

खोल दरी पडीक शेतं

रोप बी लावल्यावर

न लावता पण उगवतं


मुळं खोड पाला जरी

वेदनांना दूर पळविती

बिया बोंड गुणकारी

आयुर्वेद यास म्हणती


घरटी टांगे फांद्यांना

खोपा असे खोडाला

उपयोग होई इंधना

वस्तुंना बनवण्याला


सिमेंटची जंगले बेकार

थांबवावी ही वृक्षतोड

करू वृक्षारोपण भरपूर

बहुगुणी आहेत झाडं


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Inspirational