STORYMIRROR

Rahul Salve

Inspirational

3  

Rahul Salve

Inspirational

झाडे लावू या झाडे जगवू या

झाडे लावू या झाडे जगवू या

1 min
258

बहरु या ही धरती वृक्षांनी

हातभार लावा सर्वांनी

आपली माऊली आपली सावली

वृक्ष ही ध्यानी घ्या सर्वांनी


लोकसहभाग हा महत्वाचा

आपल्या अमूल्य कार्याचा

ठेवा जपा निसर्गाचा

लावा तुरा शिरी मानाचा


वृक्षासंपन्न नंदनवन

अवतरुया आज

फळे त्याची गोड चाखुया

चढवू भूवरी सरताज


झाडे लावा झाडे जगवा

हाच सदा खरा मूलमंत्र

दृढ निश्चय त्याचा ठेवून

फुलवा हा सारा आसमंत


हिरवळ पसरु या चोहीकडे

लावा लक्ष कोटी झाडे

पर्यटनाने गजबजावी धरती

जगाच्या या कुशीवरती


Rate this content
Log in

Similar marathi poem from Inspirational