जगून घ्या
जगून घ्या


आयुष्य फक्त एकदाच येते
पाहिजे तसं जगून घ्या
कधीतरी मिटणार ते
उघड्या डोळ्यांनी सारं बघून घ्या
लोक काय म्हणतील याचा विचार न करता
पावसात मनसोक्त भिजून घ्या
कधी कधी स्वतःच्या निवांत क्षणात
बिनधास्त निजून घ्या
आवडत्या व्यक्तीसोबत जगण्यासाठी
थोडंसं घाव सोसून घ्या
हसणे खेळणे नेहमीच असते
ट्विस्टसाठी थोडंसं रुसून घ्या
मोठ्या मनासारखा बास झाला नेटकेपणा
लहानपण थोडंसं रुजवून घ्या
आयुष्य कोरडं वाटत असताना
मायेने थोडंसं भिजवून घ्या