STORYMIRROR

manasvi poyamkar

Inspirational

5.0  

manasvi poyamkar

Inspirational

जगून घ्या

जगून घ्या

1 min
2.8K


आयुष्यभर सोबत असून

डोळ्यात कधी बघत नाही

एकाच घरात राहून आम्ही एकमेकांना दिसत नाही

हरवलाय आपल्यातला जिव्हाळ्याचा संवाद

एकमेकांना दोष देऊन नित्य चाले वादविवाद

धाव धाव धावतो दिशा मात्र कळत नाही

पाऊले कधी थबकतच नाही

अजूनही वेळ आहे थोडं डोळे भरून बघून घेऊ

सुंदर असे जगणे आनंदाने जगून घेऊ


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Inspirational