जगणे
जगणे
आजचं जग अनुभवायला
वाटते का गरज या कलाकृतीची
बघायला खूप बर वाटतसुुुुद्धा
कथा या तीन माकडांची
किती दिवस ठेवणार तुम्ही
कानावरती हात तुमच्या
ऐकू येणारे अपशब्द फक्त
नसतात झेलण्याकरता
कितीदा ठेवाल तोंड बंद
अन् सहन कराल बुक्क्यांचा मार
बरेेच शब्द करत असतात
काळजावर तलवारीचे वार
किती दिवस झापडं बांधून
निमूटपणे दुर्लक्ष कराल
कधीतरी वेळ घालेल घाला
तेव्हा कसे तुुुम्ही तराल
म्हणूनच
फक्त सहन करणं सोडा
अन्यायाला वाचा फोडा
