जगदंबा
जगदंबा
1 min
397
जगदंबा माता
जगाची माऊली
धरी माझ्यावर
कृपेची सावली १
जगदंबा माता
करितो चिंतन
जोडोनिया कर
करितो नमन २
जगदंबा माता
तूच आदिशक्ती
अनादी अनंत
करीतसे भक्ती ३
जगदंबा माता
जगाचे चैतन्य
तुची कृपासिंधू
नाही दुजे अन्य ४
शिवाची शक्ती तु
विश्वासी आधार
जगदंबा माता
मी तुझा चाकर ५
जगदंबा माता
पाजी कृपामृत
शरणांगत आलो
दे चरणामृत ६