जगावे असे आयुष्यात ह्या...
जगावे असे आयुष्यात ह्या...
जगावे असे आयुष्यात ह्या,
सुखाचे सोहळे सजवताना...
विसरू नये, मुळांना त्या गंगणझेप ही घेतांना..
जगावे असे आयुष्यात ह्या,
संकटांनाही तोंड देतांना..
हास्य असावे चेहऱ्यावरी,
भूतकाळाचाही सामना करतांना..
जगावे असे आयुष्यात ह्या,
मदतीचा हात पुढे सरसावताना..
स्वार्थ नसावा मनामध्ये,
मदत करतांना, मित्र असो वा शत्रूला..
जगावे असे आयुष्यात ह्या,
त्या,दगडाच्या मूर्तीला दुध-तेलाने न्हाऊ घालताना
एकदातरी आठवण व्हावी, त्या अनाथ अपंग मुलांची..
ज्यांना खऱ्या अर्थाने गरज आहे आपल्या मदतीची..
जगावे असे आयुष्यात ह्या,
स्वतःसाठी जगता जगता दुसऱ्यासाठीही जगता यावं..
जगात येतांना तर,खाली हात आलो,
जातांना तरी खूप काही न्यावं..
जगावे असे आयुष्यात ह्या,
मृत्युचेही आमंत्रण येतांना...
करून जावे असे खूप काही,
दगडालाही पाझर फुटावा
अखेरचा निरोप आपला घेतांना..
