STORYMIRROR

Medha Desai

Tragedy

3  

Medha Desai

Tragedy

जगाचा पोशिंदा माझा बाप

जगाचा पोशिंदा माझा बाप

1 min
971

माझा बाप शेतकरी राजा

शेतात नुसता राबराब राबतो

निसर्गावर अवलंबून त्याचे सारे जीवन

तरीही जगाचा पोशिंदा म्हणवतो १


बी बियाणं शेतात पेरल्यावर

अधाशासारखी पावसाची वाट पाहतो

पण अवकाळी पाऊस आल्यावर

नुकसानीमुळे हंबरडाच फोडतो २


मुलांचे शिक्षण आणि कुटुंबासाठी

पैशाविना चिंता करत राहतो

शेतातील पिके नि खते यांच्यातच

आयुष्यभर स्वतःचे जीवन पाहतो २


बाप माझा आधारवडच घराचा

मुलांवर संस्कार,मायेची पखरण करणारा

स्वतः दोन घास कमी खाऊन

कुटुंबासाठी काटकसरीने पैसे साठवणारा ४


शेतीवर अवलंबून जीवन त्याचे

मग दुष्काळाच्या झळांनी मात्र तो भरडला जातो

महापूर,अवकाळी,गारपीट होता

पिकांसाठी निसर्गच कर्दनकाळ ठरतो ५


पोटासाठी कमवावे लागले तरी

सरकारी कर्ज काही माफ होत नाही

संकटांचा सामना कितीही केला तरी

उपाशीपोटी कुटुंबाला पाहवत नाही ६


एक दिवस डोक्यावरचे कर्जाचे ओझे पाहून

पिकांचे झालेले नुकसान सहन नाही होत

तेव्हा जीवन संपवायचा विचार करून

आत्महत्येने मावळली त्याची प्राणज्योत ७


Rate this content
Log in

Similar marathi poem from Tragedy