जग तिचं
जग तिचं
जग तिचं कधी गेलय का कोणी सावरायला
तिच्या आयुुष्यातला पसारा स्वतःहून आवरायला
तिच्या भावनांचा कधी केला का हो विचार
तिच्या मताने कधी केला का हो आचार
तिच्या मायेचा स्पर्श थंडावूून जातो
तिच्या नसन्याने माहोल भंडावून जातो
तिच्या पंखानी केलं का हो उडण्याचं धाडस
तिच्या विचारांना मांडायच केलं कोणी साहस
तिच्या कार्याचा गौरव केला का हो कधी
तिच्या सन्मानार्थ सोहळा भरवला का कधी
