STORYMIRROR

" पुष्पाग्रज. " गायकवाड आर.जी.

Tragedy

3  

" पुष्पाग्रज. " गायकवाड आर.जी.

Tragedy

जग पैशाच्या मागे धावतय

जग पैशाच्या मागे धावतय

1 min
306

बघा कसं हे जग

पैशाच्या मागे धावतय,

पैशासाठी माणूस

वागू नये तसेच वागतंय..


मजबुरी, गरीबी, लाचारी

पैशानेच केली दरी,

माणूस झाला हैवान

पाप घडतंय किती तरी..


नाती संपली,माया आटली

होतो आहे घात ,

नाही राहिला माणूस

होतोय रक्तपात..


करु नये ते करती

देह विकल्या जातोय,

दिला, घेतला जातो जीव

पाहू नये ते पाहतोय..


पैसा,पैसा करती लोक

झाला नंगानाच,

पैसा खातोय माणूस

पैसा नी पैसाच..


गरीबांचे पहावेना हाल

देव पाप्यांना च पावतंय,

ह्या जगाचा होवो नाश

जग पैश्याच्या मागे धावतंय..


Rate this content
Log in

Similar marathi poem from Tragedy