जेष्ठ नागरिक
जेष्ठ नागरिक
थोरांचा मान खुंटला
श्रेष्ठ झाली बाळे
आजची पिढी मोजताहेत
फसवे ध्रुव तारे
वृद्ध आजीची उरली न गोडी
जी शिकवी पुरण पोळी
संस्काराच्या अभावानं
मोडली पुरी घडी
गतप्राण जाहला शेजारधर्म
नाती झाली शिळी
वाऱ्यावरती उडत चालली
नातवंडाची घोडी
अशामुळे हिरमुसत आहे
जीवनाचा गाडा
ढकल गाडी होत चालला
वर्तमान थोडा थोडा
आजचे युवा तरूण तरुणी
जे उद्या जेष्ठ होतीन
जशी शेती करतीन पोरे
तसे पीक येतीन
जेष्ठ नागरिक सन्मान अपुला
करू नका माधुकरी
संस्काराच्या शाळेची
पेटवू नका होळी
