।। जात्यावरची ओवी ।। पहली म
।। जात्यावरची ओवी ।। पहली म
पहली माझी ओवी गं
माझ्या माय बापाला
पोटी मला जन्म दिला
ये रे बाळ विठ्ठला ... ।।
दुसरी माझी ओवी गं
गुरू माझ्या माऊलीला
शिक्षणाचा मार्ग दिला
ये रे बाळ विठ्ठला .... ।।
तिसरी माझी ओवी गं
माझ्या जन्म भूमीला
अमृताचा पान्हा दिला
ये रे बाळ विठ्ठला .... ।।
चौथी माझी ओवी गं
माझ्या बळी दादाला
पोशितो रे जगाला
ये रे बाळ विठ्ठला ... ।।
पाचवी माझी ओवी गं
राबनाऱ्या बैलाला
भार त्याच्या खांद्याला
ये रे बाळ विठ्ठला .... ।।
साहवी माझी ओवी गं
गोठ्या हंबरे गाय
तान्ह्या वासराची माय
ये रे बाळ विठ्ठला .... ।।
सातवी माझी ओवी गं
माझ्या गावच्या देवाला
नवसाला पावला
ये रे बाळ विठ्ठला .... ।।
आठवी माझी ओवी गं
माझ्या घरा दाराला
सुखी संसार फुलवीला
येरे बाळ विठ्ठला .... ।।
नववी माझी ओवी गं
गजानन बाबाला
संकटात धावून आला
ये रे बाळ विठ्ठला .... ।।
दहावी माझी ओवी गं
हात जोडीतो देवाला
सुखी ठेव माय बापाला
ये रे बाळ विठ्ठला .... ।।