जाणीव...
जाणीव...
ती जाणीव सतत राहावी
म्हणून मी असताे संपर्कात,
म्हणून तुझ्या ऊर्जेच्या दिव्याला
मी नेहमी करताे तेलवात...
ती जाणीव सतत राहावी
म्हणून मी मुद्दाम असा वागताे,
गरिबीतून आलाेय मी वर
म्हणूनच तुझं आशिष मी मागताे...
ती जाणीव सतत राहावी
याची जाण मी ठेवताे वारंवार,
म्हणूनच टिकून आहे ही
आप्तस्वकीयांमध्ये प्रेमाची धार...
ती जाणीव सतत राहावी
या जाणीवेचा माझ्यात संचार,
या जाणीवेपाेटी मी करेल
माझा समृद्ध भवसागर पार...
