STORYMIRROR

Prashant Shinde

Romance

3  

Prashant Shinde

Romance

जागे व्हा!

जागे व्हा!

1 min
1.1K


जागे व्हा...!!!

तरुणांनो जरा जागे व्हा जागे व्हा

व्हॅलेंटाईन च भूत आलय पहा

सात रंगांची इंद्रधनुष्य कमान

आमची सांगा त्याला आहे महान

रोज डे, प्रपोस डे ,चॉकलेट डे,

टेडी डे ,प्रॉमिस डे ,हग डे,

व्हॅलेंटाईन डे हे सात दिवसाच

पाश्चिमात्यांचं साप्तिक फॅड

सप्त स्वरांची ,सप्त रंगांची ,सप्त गुणांची,

सप्त रसांची ,सप्त वारांची,सुप्त ऋषीची

सप्त राशिंची, सप्त स्वादांची लावून वाट

तरुणांनो तुम्हाला पुरत करतय मॅड

अंधत्वाची वाटचाल सारी

तरुण पिढीला वाटते भारी

लोभस गोंडस असली जरी

सरते शेवटी म्हणाय लावतय सॉरी

म्हणून तरूणांनो वेळीच सारे जागे व्हा

वारसा ज्ञानी संस्काराचा पहा जरा

भूत गाढुनी व्हॅलेंटाइन चे आता

सण वार आपल्याच संस्कृतींचे साजरे करा

वेळ ही अमूल्य अजूनही

हातून तुमच्या काही गेली नाही

शिक्षण चांगले घेण्याशिवाय

जगण्यासाठी दुसरा चांगला पर्याय नाही

मौज मस्ती सारे काही जरूर करा

मान मर्यादा राखून तुमचाआनंद लुटा

शिक्षणाची कास धरून नित्य प्रगती करा

स्वप्न सक्षम सदृड सबळ समृद्ध देशाचे सार्थ करा...!


Rate this content
Log in

Similar marathi poem from Romance