STORYMIRROR

Manisha Wandhare

Romance

3  

Manisha Wandhare

Romance

जादूई आकर्षण...

जादूई आकर्षण...

1 min
107

तुला पाहता मन थबकले,

जादूई आकर्षणाने मन ओढले ,

हा कोणता धागा जो दिसेना,

तुझे माझे बंध तुटेना ...

भेटायची त्याला धुंद वाट,

अलगत स्वप्नांच्या गावी ,

वेडावलेली स्वप्न माझे ,

मला काही करमेना ,

हा छंद कोणता काही कळेना ,

तु मला हवा की मी तुला ,

हे समजेना आता करमेना ...

तू दिसता मनाची तळमळ ,

तू दिसता मोगऱ्याची दरवळ ,

रिमझिम सर बरसते ,

मातीचा सुगंध तिला बिलगते,

सारा आसमंत हा गंधाळलेला ,

हा रस्ता ओळखीचा,

अंधारलेला टिपूर चांदणं,

आसमंती दुधात न्हालेला चंद्र,

माझ्या उराशी या क्षणाला ...

फितुर मन थांबेना ,

तू असाच इथे राहणा,

हातात हात माझ्या देना,

या प्रेमाची साद ऐकना ,

मला काही करमेना ,

हा छंद कोणता काही कळेना ,

तु मला हवा की मी तुला ,

हे समजेना आता करमेना ...

तुला पाहता मन थबकले,

जादूई आकर्षणाने मन ओढले ,

हा कोणता धागा जो दिसेना,

तुझे माझे बंध तुटेना ...


Rate this content
Log in

Similar marathi poem from Romance