STORYMIRROR

Sanjay Raghunath Sonawane

Abstract

3  

Sanjay Raghunath Sonawane

Abstract

इंटरनेटची शाळा-कविता

इंटरनेटची शाळा-कविता

1 min
161

एकदा काय झाले 

इंटरनेट बोलू लागले 

ऐटीत गर्वाने फुलले 

सर्वांस गोष्टी सांगू लागले 


शिक्षणाचा राजा मी 

हुकूम सोडतो सर्वाना 

सर्वांस शिकवितो मी 

आज्ञा आहे विद्यार्थ्यांना 


मीच म्हणजे शिक्षण 

मीच म्हणजे जीवन 

जग भुलविले आपण

आपल्या शिवाय नाही जगणंं 


मुले आनदांने नाचले 

इंटरनेटचे स्वागत केले 

पक्षी,प्राणी तेही आले 

आनंदाने गाऊ लागले 


मग काय झाले 

इंटरनेट रडू लागले 

मध्येच बोलणे थांबले 

मित्र कावरे बावरे झाले 


प्राण कासाविस झाला 

दम त्याचा कोंडला 

हळूहळू चालू लागले 

संभाषण सारे संपले 


गर्वाचे शब्द संपले 

हळूच गायब झाले 

सर्वकाही तिथे थांबले 

स्वत:चे अज्ञान कळले 


इंटरनेट म्हणजे धोका 

शिक्षणात मोठा धक्का 

भयंकर संकट ओढविण्याचा  

जीवंत शिक्षण संपविण्याचा


Rate this content
Log in

Similar marathi poem from Abstract