I am different....!!
I am different....!!


तू नाहीच ओळखलीस
तुझ्यातली 'तू'......!
इतकें लिंपण चढवलेस
स्वतःवर, वेगळे पणाचे,
आणि त्यात घालून घेतल्या,
स्वतःलाच मर्यादा.....!
असामान्यपणाची झूल घालून
अतिसामान्य होताना
हरवलेस सोन्याचे क्षण
चौपाटी वरील भेळ
दोरी वरच्या उड्या
मैत्रिणीसोबत मस्ती
जीवनातील सहजता....!
कृत्रिम सुखाच्या नादात
अनुभवता नाही आलें
मोकळ्या रानातील
रानफुलांचे डोलने
फुलपाखरांचे बागडणें
पावसाच्या धो धो सरी
चिखलात माखणें
नि पायात काटा टोचणें...!
स्वातंत्र्याची आहुती देवून
बांधून घेतलेस स्वतःला
मोठ्या गाडीत, सेंट्रल एसीत
फार फार तर, फार्म हाऊस
आणि लाँग ड्राईव्ह....!