STORYMIRROR

Sanjana Kamat

Inspirational

3  

Sanjana Kamat

Inspirational

हव्यास

हव्यास

1 min
335

निरागस हास्य ते चेहऱ्यावर,

बाबा असतानाच दिसले.

मी अनपढ म्हणत लेकास,

सारे आधीच देऊन फसलेली.


संसार रहाटाला चौदाव्यात जुपली,

नणंदा,दिर,चार पोर, इतरा ही पोसत.

लक्तरांस तुरपाई मारत हसलेली,

संपात सुखात स्वाभिमानात जगत.


नात्यातील विश्वासघाती ती तुरपाई,

कच्चा दोऱ्यागत सहज विखुरली.

निरागस प्रेम,निष्ठा सदा जपलेली,

नात्यातील नाती जोडत फसलेली.


लेकराचा पगार लेकरास पुरे नाही,

एकाच मुलाचे शिक्षण ते झेप नाही.

साऱ्यांसाठी राबण्यात धन्य ती माय,

सोन्याचा दिवस, पण हव्यास पाही.


आतातरी सुखाचे घास खा तू बसून,

तिच्या हातच्या शिरा उलट्या सगळ्या.

म्हणे त्राण शरीरात मी कष्टाच खाईन,

सत्वपरीक्षेचा खेळ होतोच आगळा.


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Inspirational