हवा गावाचा अभिमान
हवा गावाचा अभिमान
विकासासाठी येतोय
माझा एकत्र सारा गाव,
हा जो बदल घडतोय
आहे विकास त्याचं नाव...
आपणच करु शकतो
आपल्या गावचा विकास,
आपलीच परीक्षा आहे
कामाला लागा व्हा सारे पास...
बंधुभाव, एकात्मता
नांदो गावात शांती,
करु नियोजन विकासाचे
चला करु नवी क्रांती...
कायापालट करु गावाचा
वाढेल आपली शान,
या राजाच्या गावाचा
हवा सर्वांना अभिमान...
