हसत दिवाळी येऊ दे
हसत दिवाळी येऊ दे
जळू दे सारं झालं गेलं, सारं मंगल होऊ दे
साऱ्यांच्या घरी, साऱ्या दारी हसत दिवाळी येऊ दे
जगतो सारे भिन्न, परी सन सारखा होऊ दे
प्रत्येक घरी तो, सुखाचा दिवा लागू दे
आनंद मिळावा साऱ्यांना, हेच दृश्य असू दे
साऱ्यांच्या घरी, साऱ्या दारी हसत दिवाळी येऊ दे
असतील सारे दिवे भिन्न, प्रकाश सारखा राहू दे
अंतर असेल कमी जास्त, साऱ्यांची भेट होऊ दे
धन असं काही नाही, पण आनंद सारा मिळू दे
साऱ्यांच्या घरी, साऱ्या दारी हसत दिवाळी येऊ दे
साऱ्यांची भूख सारखी, पोट सारे भरू दे
रुसवा नको कुणाला, आनंद एवढा येऊ दे
मरगळ साऱ्या सालाची, सारी लांब जाऊ दे
साऱ्यांच्या घरी, साऱ्या दारी हसत दिवाळी येऊ दे
स्वप्न साऱ्यांची मोठी, पूर्ण सारी होऊ दे
गाऱ्हाने लोकांचे सारे, भगवंताला आता मानू दे
सुखं सुखं काय ते, साऱ्यांना आता भोगू दे
साऱ्यांच्या घरी, साऱ्या दारी हसत दिवाळी येऊ दे