STORYMIRROR

Deepali Mathane

Tragedy

3  

Deepali Mathane

Tragedy

हसरे दुःख

हसरे दुःख

1 min
483

संसार सागरात भरल्या

सुख-दुःखाच्या जीवन लाटा

शिंपल्यातील मोती शोधण्या

उधळून देई सागर वाटा

    हसऱ्या क्षणांना सोबत

   किनाऱ्यावरील हळवा साठा

   भावनांना गुंतवूनी मनी

   हुंदक्यांना भरूनी काठा

लपवूनी अश्रू पापणीतले

हसरे दुःख ते करूनी मोकळे

मनाला या स्वतःच छळूनी

वेदनेचे साजरे करूनी सोहळे

    शब्दांचे आधार पोकळ

    अधांतरी सोडूनी जीवास

  स्वतःलाच मग मारूनी मीठी

   मोकळे करूनी अपुले श्वास

छळूनी निरागस जाणीवांना

रूतले कितीदा बोल खडे

हसऱ्या जखमांनी सांडले

वाटेवरती लाल सडे

  अश्रूंची ओंजळ करूनी रीती

   एक उसासा घ्यावा भरूनी

    हसवूनी पुन्हा वेदनेला

   पुन्हा जगावे पुन्हा मरूनी


Rate this content
Log in

Similar marathi poem from Tragedy