STORYMIRROR

Savita Jadhav

Inspirational

3  

Savita Jadhav

Inspirational

हसा आणि हसवा

हसा आणि हसवा

1 min
11.4K

हसऱ्या क्षणाच्या ओल्या सरी,

जपून ठेवाव्या आपुल्या अंतरी,

हसत जगावे साऱ्यांनी परोपरी,

हीच जीवनातील दौलत खरी...


आपल्या चेहऱ्यावरील हास्य,

देई इतरांनाही प्रसन्नता,

राग, द्वेष, मत्सर होई दूर,

मग का हास्य लपवता...


ओठावरचं गोड हासू,

औषधाचं काम करतं,

मोकळेपणाने हसलात तर,

जीवनातील अमृत बनतं...


मरगळल्यागत राहून का द्यावी,

स्वतःला अन् दुसऱ्यांनाही सजा,

हसत राहावे सदा सर्वदा

जगण्याची येईल वेगळीच मजा...


Rate this content
Log in

Similar marathi poem from Inspirational