हरवून जाते मन(अष्टाक्षरी)
हरवून जाते मन(अष्टाक्षरी)
रत्न उधळे सौंदर्याचे
शुभ्र दुग्ध खळखळे
दृश्य मृग्ध स्वर्गमयी
सृष्टी दातृत्व उधळे
झरे विद्युत गर्जती
नित्य अविष्कार नवा
ऋण बहार फुलवी
झुले प्रितीचा पारवा
धुंद तुषार उधळे
सृष्टी प्रांगण बहरे
झंझावात हिरवाई
दरी डोंगर गहरे
हरवून जाते मन
तन डोले उत्साहाने
ऋतू प्रेमांकूर नाचे
मनी कस्तुरी तऱ्हाने