STORYMIRROR

Achyut Umarji

Tragedy

3  

Achyut Umarji

Tragedy

हरवलेलं बालपण

हरवलेलं बालपण

1 min
144

सगळ्यांना बालपण आवडतं...

बालपणात मात्र...

तरुण व्हायचं असतं...

त्याचं आकर्षण असतं...


तरुणपणी जवाबदारी वाढते...

घरची,नोकरी याची जवाबदारी...

पुढं जाऊन लग्न करायचं वय होतं...

बायको,मुलांची जवाबदारी...

आई वडीलांची जवाबदारी...


पुढं...

बायको, स्वतःचं म्हातारपण...

आई वडीलांची सेवा सुश्रुषा करणे...

जवाबदारी संपता संपत नाही...


अशा वेळेला आठवण येते...

बालपणाची...

ती निरागसता...

कुठल्याही प्रकारची काळजी नाही...

सगळे आपण लहान असल्यामुळे...

आपल्या काळजीत दंग असतात...

अन्...

आपण बेफिकीर असतो...


राहून राहून तेंव्हा आठवण येते...

बालपणाची...

कधी सुरू झालं...

कधी संपलं...

कळायच्या आधीच संपून गेले...

संपून ना जाता...

बालपण हरवल्याची जाणीव होते...


देवा म्हातारपण ऐवजी...

परत एकदा बालपण दे...

देवा तुझ्या चरणी ही प्रार्थना.


Rate this content
Log in

Similar marathi poem from Tragedy