STORYMIRROR

Seema Kulkarni

Abstract

3  

Seema Kulkarni

Abstract

हर्ष मनाला, नववर्षाचा

हर्ष मनाला, नववर्षाचा

1 min
155

प्रकाश पहिल्या किरणांचा

वसुंधरेच्या गाली पडला 

रोमांचित ही तनु जाहली 

स्वर्गसुखाचा आनंद झाला १


पहाट कोवळी नववर्षाची 

दवबिंदूच्या कणा कणांची 

अलगद टिपता क्षण सोनेरी

 उमलत्या बकुळ फुलांची २


सुगंधात ही प्रभात न्हाली  

कोरली नक्षी अंबरी

नवतेजाने गगनही झळके 

स्वप्न उद्याचे सोनेरी ३


घेऊ भरारी आशेची 

विहार करू गगनाचा 

पंखांना या बळ देऊनी

जल्लोष नव्या वर्षाचा ४


साकार करू ध्येयाला 

नववर्षाच्या त्या स्वप्नांना 

ज्योत पेटवू मनामनाची

 ठेवू अबाधित सुखांना ५


हर्ष दाटतो चहूकडे

मना मधुनी सूर उमटतो 

सकाळ सोनेरी नववर्षाची

एक अनामिक सुगंध येतो ६


Rate this content
Log in

Similar marathi poem from Abstract