हरितक्रांती...
हरितक्रांती...
.... हरितक्रांती ....
पर्यावरणाचे मोल जाणू या
या जाणू या निसर्गाची किमया
मानव जीवन अवलंबित
अवलंबित ही सारी लिलया...
मानवाला देई सावली झाड
झाड देई फूल फळ निवारा
वृक्षतोड नको करू मानवा
मानवा निसर्ग तुझा सहारा...
विश्वाचा आधार असे निसर्ग
निसर्ग ब्रह्मांडात सामावले
मानवाचा संबध निसर्गाशी
निसर्गाशी हिरवे नाते झाले....
जपू या हे हिरवे नाते आता
आता पर्यावरणाचा विचार
वृक्षारोपण करून राखू या
या करा हरितक्रांती विचार....
... ©सौ. गीता विश्वास केदारे....
मुंबई