Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!
Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!

ANJALI Bhalshankar

Abstract Others

3  

ANJALI Bhalshankar

Abstract Others

होऊ दे अंधार दूर मनाचा

होऊ दे अंधार दूर मनाचा

1 min
358


आपण सजवू घरं हजारो दिप लावु दारी.

करू झगमगाट आकाशकंदिलाचा.

उजळून टाकू पहाट, थाट करू प्रकाशाचा.

आधी दूर करू अंधार एक तरी झोपडीचा. 🎊🌠


आपण दारी तोरण लावू, सडा रांगोळी काढू,

सोडू दिपमाळा, करू उत्सवाचा सोहळा अंगणात,

दूर होऊ दे अंधार आधी वसलेला मनामनात,

हसू फुलवायला निमित्त होऊ एक तरी कुटुंबात. 🎊🎊🎆


आपण करू हौसमौज, दागिने आणि नव्या कपड्यांचे बेत,

नव्या वस्तूंचे बांधू घाट.छोटासा हिस्सा राखू याच त्यांच्यासाठी

जे आहेत अनाथ.निरागस चेहऱ्याची चमक लाख दिव्याहून मोठी.

पाहून भेट हास्य पहा ऊमटेल ओठी. 🎊🎊🎊🎆


आपण खावू गोडधोड, सजवू फराळाची ताटं,

मिठायांची जव ठेऊ जीभेवर रेंगाळत.

जरा आठवू या त्यांनाही जे पोटभर अन्नाला मुकतात.

घासातला घास देऊन करू भूकेल्याला तृप्त.


बदल घडू दे आता नवे समाजात

अजीर्ण होईल इतके नको कोणा एकिकडे

समान हक्क जगण्याचा असो समाजातील साऱ्याच घटकाकडे. 🎊🎊🎊🎊🎆


तुझा, माझा, तुमचा, आमचा नको उत्सव होवो साऱ्याच समाजाचा

दिप, पेटतो दिपाने तसा सोहळा होऊ दे एकीचा.

दूर करू अंधार जातीभेदाचा.वर्ण आणि उच्च नीच भावनांचा,

तरच खऱ्या अर्थाने सार्थ होईल सण दिपावलीचा 🎊🎊🎊🎊🎊🎆


Rate this content
Log in

Similar marathi poem from Abstract