STORYMIRROR

Pranjali Kalbende

Abstract

3  

Pranjali Kalbende

Abstract

होळीचा सण

होळीचा सण

1 min
168

होळीचा सण येता

उत्साहात नाचे मन

रंगात रंगून जाई नभांगण...

प्रतिक्षेत काळीज ते

रूसलेले काही कारणांमुळे,

शोधार्थ नेमक्या क्षणाच्या 

कधीपासून हिरमुसलेले....

मिलापाच्या सणाला या

द्वेषरंग विरघळून जाई,

मित्रत्वाच्यासंगी झोकाळे

संगतीची सर बरसून येई....

होळीचा सण आला म्हणजे

वसंत फुलतो मनामनात,

आनंदाच्या छटा आसमंतात...

भरलेली मैत्रिची हि घागर

पुरते संपूर्ण वर्षभर

म्हणून यावा होळीचा सण,

रितेपणाचा धरण्या कर...


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Abstract