Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!
Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!

Abasaheb Mhaske

Romance

2  

Abasaheb Mhaske

Romance

हो ग हल्ली मी तुला टाळतोय..

हो ग हल्ली मी तुला टाळतोय..

1 min
7.3K


हो ग खरंय.. हल्ली मी तुला टाळतोय 

कारण ... ज्या गावाला जायचंच नाही 

त्या गावचा रस्ता विचारायचाच कशाला ? 

झालं गेलं विसरून जा तू ही त्यातच तुझं भलं आहे ..


तसही तू नाहीच होणार माझी ,ठरलेलं... 

मग उगाच माझ्यामुळे तुला त्रास कशाला ? 

क्षितीज जस आभासी तसंच तर आपलं नातं 

मनातलं चांदणं ते त्याला कोण विचारतं ? 


कितीही नाही म्हटलं तरी . मार्ग आपुले वेगळे 

नकोच हव्यास त्या स्वप्नाचा.. जे कधीच पूर्ण होणार नाही 

आभासी मृगजळाने कधी तृष्णा भागत नाही

छेद पडलेल्या नावेला बुडण्यास वेळ लागत नाही  


खरंच ग आता तुला वेळीच सावरायला हवं ...

माहित्येय मला ते इतकं सोप्प नाही .तुझ्यासाठी 

वास्तव कितीही कटू असलं तरी ते तू स्वीकारायला हवं  

प्रेमाची किंमत कधीच कुणाला कळली नाही , कळणारही नाही 


माहित्येय ना तुला ? प्रेमाचे संकेतही फारसे कुणी सहसा पाळत नाही 

प्रेम हे पवित्र असत हे कुणाला पटत नाही ... जाऊ दे ग नाही तर नाही 

जन्मभराची साथ नाहीस दिली पण मैत्री मात्र विसरायची नाही 

ऋणानुबंध , प्रेम आपुले जन्म -जन्मतरीचे, अतूट चिरकाल टिकणारे ...


Rate this content
Log in

Similar marathi poem from Romance