तुच नदीचा किनारा...
तुच नदीचा किनारा...
का? कळेना मला ,
असा बेभान वारा ,
चिंब भिजणारा पावसाळा
फुलवी ऋतुचा शहारा ...
तुझा स्पर्श गाली ,
जणु अलगद मोरपिसारा,
तुझ्या आठवणीत ,
बहरला मोगरा गंधाळणारा ...
नवा नवा हा क्षण,
नव्या स्वप्नात जागणारा,
रंगणारा हा गुलाब ,
तिच्या ओठावर खुलणारा...
कळत नकळत घडून गेले,
कसा केला तु इशारा ,
गुलाबी गुलाबी हे क्षण झाले ,
तुच या नदीचा किनारा ...