STORYMIRROR

Sarika Jinturkar

Romance

3  

Sarika Jinturkar

Romance

रंगात रंगले मी

रंगात रंगले मी

1 min
11

उधळले प्रीतीचे रंग तू 

तुझ्या रंगात रंगले मी 


छेडल्या हृदयाच्या तारा 

तुझ्या प्रत्येक हास्यात 

नकळत हरवले मी  


जिवापाड जपले तू 

श्वास गुंतवूनी 

तुझ्यात रमले मी 

क्षणात आपले केलेस 

 तुझ्या वेड्या प्रितीत

 बेधुंद झाले मी 


 भावनांचे विश्व 

निर्मिलेस तू 

भावविश्वाच्या स्पंदनात

 बुडाले मी  


रंग आपल्या नात्याचा 

पाहुनी असे भारावले मी 

बरसविल्या प्रेमाच्या सरी तू

त्या हळव्या क्षणात  

स्वच्छंद भिजले मी

उधळले प्रितीचे रंग तू 

तुझ्या रंगात रंगले मी..


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Romance