STORYMIRROR

ravindra budhkar

Romance

3  

ravindra budhkar

Romance

जीव माझा जडला

जीव माझा जडला

1 min
10

भोळे मन माझे

असे तु काय केले

वारंवार उसळते

काहीतरी घडून गेले


तुझ्याविना रहाणे

आता अवघड वाटते

समोर तुला बघताच

जीवाची धडधड वाढते


तुझ्या जादूची किमया

सभोवतार पसरली

पाठमोरी वा सामोरी

सतत छबी तुझी दिसली


तुझे मिठीतले घेणे 

आठवून बेचैन करते

तु दिलेल्या भेटींना

अनाहुतपणे स्पर्श करते

 

मनातले खोल भाव

भवरे बनून फिरवतात

बुडवून वर काढण्याचा

अजब वेडेपणा करतात


विक्षिप्तपणा वेडेपणा

तुझ्यामुळेच घडला

कबुल करते तुझ्यावर 

जीव माझा जडला


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Romance