वैफल्य
वैफल्य
1 min
161
प्रेम तुझ्या पदरी
साथ तूझी सुटली
दुःख माझ्या माथी
वाट माझी खुंटली
पुजले मी देवाला
सहज तुला पावला
कौल तुझ्या बाजूनी
खोड मला टाकला
जीवनात तुझ्या
सप्तरंग भरले
अश्रु दाटले नयनी
स्वप्न माझे भंगले
ताटवे गुलाबांचे
वावरात तुझ्या फुलले
काटे बाभळीचे
उरात माझ्या रूतले
