शेतकरी राजा
शेतकरी राजा
दाणा दाणा पिकवतो
शेतकरी शेतात राबतो
ह्यांचेच खाऊन माजून
बाजीराव उरावर बसतो
कर्जाला भरीस पाडून
गहाण खत बनवतो
ह्यांचे घरदार लुटून
सरकार म्हणून घेतो
समाज, अर्थ व्यवस्थेचा
शेतकरी कणा असतो
जगाचा पोशिंदा म्हणून
फास गळ्यात बांधतो
उन, पाऊस, वारा, वादळ
बारामाही राबराब राबतो
बाजारातल्या दलालांसमोर
भीक मागत उभा रहातो
कृषि प्रधान देशातला
शेतकरी राजा असतो
मंत्री, जंत्री, आयतोबा
फुकट खात बसतो
