वेध प्रेमाचे
वेध प्रेमाचे
नाद खुळा जडला
खेळ वाढले मनाचे
प्रित सुगंध दरवळला
वेध लागले प्रेमाचे
समयाचे भान ना उरले
दिवा उजेडीही चमकले
हरकतीचे चांदणे तारे
गालातल्या गालात हसले
कामातल्या हातांची
गती भारी वाढली
खाणाखुणा करताना कामे
हाता वेगळी सारली
कितीदा डोकाविले
पडदेही पुन्हा सारले
मनातले प्रेमभाव
पडद्या वर उमटले
भ्रमराचे गुणगुणणे
कळा लाजुन फुलतो
फुललेल्या फुलातून
मकरंद पाझरतो

