समर्पण...
समर्पण...
पहिल्या नजरेचे ,
पड़घम मनावर पडले,
तुच आहे सोबती जिवनाचा,
मनाने मला सांगितले...
देता ग्वाही मनाने ,
पाऊल पुढे टाकले,
साथ देशील का? मला,
आयुष्यभरासाठी मी तुला निवडले...
ही माझी दृढ इच्छाशक्ती बघून,
काळीज तुझेही द्रवले ,
असे प्रेम करणार नाही कुणी,
तु कानात हळूच म्हटले ...
शब्द तुझे ऐकुनी,
मी न माझी राहीले ,
तु सखा प्रियकर सोबती ,
हे जिवन तुला समर्पित झाले...