Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!
Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!

Manisha Wandhare

Romance Others

3  

Manisha Wandhare

Romance Others

तुझ्या पैंजणातील घुंगरू...

तुझ्या पैंजणातील घुंगरू...

1 min
13


तुझ्या पैंजणातील घुंगरू ,

छनछनाट करतो आहे ,

जणू होऊन पाखरू ,

मनात माझ्या उडतो आहे...


थबकलो मी उंबरठ्यावरी,

घाट बाहेरचा दिसतो आहे,

पाय निघेना माझा इथून,

मलाच तो अडवतो आहे ...


पायातील पैंजणात तो,

मदमस्त रूसतो आहे,

कोण जाने मनात काय ,

रुखरुख व्यक्त करतो आहे...


आज थांबना तु इथे ,

रात्र ताऱ्यांची बघतो आहे,

गंधाळला मोगरा का?,

मलाच पुसतो आहे...


तुझ्या पैंजणातील घुंगरू ,

छनछनाट करतो आहे ,

जणू होऊन पाखरू ,

मनात माझ्या उडतो आहे...



Rate this content
Log in

Similar marathi poem from Romance