STORYMIRROR

Nurjahan Shaikh

Inspirational Others

3  

Nurjahan Shaikh

Inspirational Others

हमी

हमी

1 min
234

देई आश्‍वासनाची हमी 

पूर्ण करण्यास अंतवेळी  

न होता हे काम पूर्ण 

आश्वासक पडे बळी


दारिद्र्याचे गलिच्छ चित्र 

रेखाटूनी कोऱ्या पत्रावर 

हमी भरे लोकप्रतिनिधी 

निवडणुकीच्या सत्रावर


पडती जनता भ्रमात 

बघुनी भविष्य स्वप्नात

विश्वास ठेवून हमीवर 

घेऊन कर्ज हातात 


दिसे ना या जनतेस 

खोटे पत्र हमीचे 

आशा लागे मनास 

जीवन होई समृद्धीचे 


देता हमी लोकास 

विचार करावा दहादा 

करू शकू का पूर्ण 

मनास विचारा हजारदा.


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Inspirational