STORYMIRROR

UMA PATIL

Fantasy

1.0  

UMA PATIL

Fantasy

हळूहळू दे रे झोका

हळूहळू दे रे झोका

1 min
14.3K


फोडतो मडकी पाहून मौका

कान्हा, हळूहळू दे रे झोका..... ॥धृ॥


दुधाने भरली दोन्ही मडकी

घट वळणदार गोल - गोल

कधी आला कोण जाणे ?

आला माखनचोर - माखनचोर.....॥१॥


विसरून गेलो माहेरपण

दिवसरात्र कष्टतो सासरी

भरल्या उन्हात जाऊ तळ्यात

तेथे कृष्णा वाजवी बासरी..... ॥२॥


विसरती ह्या गोपी देहभान

बासरीच्या सुरांत अवीट गोडी

नको ना काढू चिमटा आम्हांला

मुरलीधरा, काढू नको खोडी..... ॥३॥


जा हवा, सांग खुशाली माहेराला

माहेर माझे जणू सुगंधी चंदन

हरवले माहेरपण आता आमचे

आला रे आला केशवनंदन..... ॥४॥


वस्त्रे ठेवली काढूनी काठाशी

तळ्यात पोहताना होई आनंद

वस्त्रे नेली चोरून आमची

असा कसा रे, कसा तू गोविंद..... ॥५॥


असा नटखट रे यशोदेचा कान्हा

खातो हा रोज दही - काला

नाव त्याचे येताच मुखात

हळूच आला तिकडून नंदलाला....॥६॥


कृष्णरंगी गोपिका झाल्या दंग

बासरीने हसवतो तान्ह्या बाळा

सोडव आम्हांला तू संकटातून

तू रे माधवा, तू रे गोपाळा..... ॥७॥



Rate this content
Log in

Similar marathi poem from Fantasy