STORYMIRROR

Manda Khandare

Abstract Others

4  

Manda Khandare

Abstract Others

हल्ली

हल्ली

1 min
175

विचार विचारात इतके 

गुंततात का हल्ली. 

वाटा निष्कर्षाच्या ... 

हरवतात का हल्ली. 


मनाची धाव आठवणींच्या

पानवठ्यावर नेहमी. 

तरी जुन्या जख्मा तहानलेल्या

 राहतात का हल्ली. 


पैलतिरी सोडून आले, 

जरी गाठोडे दुःखाचे. 

सावल्या त्याच्या अश्या जवळ 

भसतात का हल्ली. 


उभ्या जन्माचे हिशोब दिले

नशीबाच्या हाती. 

मागचे उरलेले हातचे, 

छळतात का हल्ली. 


गाव दुर राहिला, 

सुखाचे होते घरटे जिथे

विसरूनही ते चेहरे स्मृतीत

रडवतात का हल्ली. 


खीपली जरी उडाली 

घाव पूर्ण भरल्यावर. 

आतमधे जखमा अश्या

ठसठसतात का हल्ली. 


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Abstract