STORYMIRROR

गोविंद ठोंबरे

Tragedy

3  

गोविंद ठोंबरे

Tragedy

हलाल

हलाल

1 min
14.1K


दाह ऐसा फोडताना

किंचाळते का उर तीचे

फाटते काळीज आणि

सांडतात का घाव तीचे


लचके घेतल्या शरीराचे

शापीत जिणे का जीवनाचे

का कुठे मग जीव जातो

रक्त ओले पापणीचे


विदाईचे स्वप्न सारे

का कसे मग चूर होते

सरणावरती जाळताना

नाते तीचे का स्वाह होते


लांडग्यांच्या अंगणी का

कोवळ्या मनाचे घात होते

शरीर सुखाच्या हवसेपोटी

स्त्रीत्व का मग हलाल होते...


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Tragedy