हिरवे मन
हिरवे मन
हिरवे तृप्त झाले मन
हिरवा निसर्ग पाहून ll धृ ll
निळ्यांनभी दाटे मेघ
गालिचा मऊ धरेवर
हिरवे पाचूचेच बेट
उभे पाण्याच्या बेचक्यात..१
मध्यान्हीची झाली वेळ
सूर्य आला डोईवर
लपे काळ्या ढगाआड
शीतल सावली येई दाट..२
अथांग निळा जलाशय
कधी उसळे कधी शांत
जसे आपुलेच ते मन
न घेता येई कधी ठाव..३
सुखी या जीवनास
जपा हृदयी कप्प्यात
मन जेव्हा ते उदास
आठवा आनंदी क्षणास..४
हिरव्याची असे जादू
मन पाखरू पाखरू
उंच उडाले आकाशी
धरेशी त्याची नाळ..५
शब्द रंगले हिरव्यात
ओळी रचल्या मनात
रिमझिम सुरु बरसात
उतरवे आठव कवनात..६
हिरवे तृप्त झाले मन
हिरवा निसर्ग पाहून ll धृ ll