STORYMIRROR

Prashant Kadam

Inspirational

2  

Prashant Kadam

Inspirational

हिमा वलय !!

हिमा वलय !!

1 min
392

गर्व आहे प्रत्येक भारतीयाला

सुवर्ण कन्या हिमा दास चा

तिने एका पाठोपाठ पाच सुवर्ण जिंकले

अन् आपल्या देशाचं नाव उज्वल केले

हिमालया इतके ऊत्तूंग कार्य साद्य केले,


इतकेच नव्हे तर एवढ्या लहान वयात

आसाममधील पुरग्रस्तांसाठी 

पुरस्कारातील निम्मे पैसे दान करुन

सामाजिक बांधिलकीची जाणीव दाखवून 

तिने आपल्या शिरपेचात अजून 

एक पुरस्कार घेतला आहे खोचून,


खरंच कौतुक आहे ह्या धावपटूच

कार्य केलं आहे तिने झकास पट्टीच

घडविला आहे एक उत्तूंग इतिहास

ठेवला आहे अनोखा आदर्श खास,


चला आपण ही एक काम करुया

जिने देशाचं नाव उंच केलंय 

निर्माण केलंय उल्लेखनीय वलय

त्या हिमा दास चा सन्मान करुया

तिच्यातील गुणांच कौतुक करुया

इतरही खेळाडूंना प्रोत्साहित करुया !



Rate this content
Log in

Similar marathi poem from Inspirational