हे वर्ष...
हे वर्ष...
हे वर्ष जावाे आपणास सुखदायी,
प्रथम असावे प्राधान्य,जावाे आपणास आरोग्यदायी
हे वर्ष पूर्ण व्हाव्यात मनाेकामना,
समृद्धी लाभून मिळू दे यश,हीच आमची शुभकामना
हे वर्ष,पूर्ण व्हावीत स्वप्न मनातील इच्छा आकांक्षा,
ह्याच माझ्या मनःपूर्वक शुभेच्छा आणि सदिच्छा
हे वर्ष जबाबदारीचे भान,व्हावा कामाचा विस्तार,
सहकार्याच्या माणुसकीचा व्हावा प्राधान्याने विचार
