हे ठीक नाही
हे ठीक नाही
प्रेमात असा दुरावा
हे ठीक नाही
मागतेस प्रेमाचा पुरावा
हे ठीक नाही || 0 ||
रागाने बघू नकॊ
तुझ्यावर मरतो मी
विश्वास ठेव तुझ्यावर
प्रेम करतो मी
मनात द्वेष मुरावा
हे ठीक नाही
मागतेस प्रेमाचा पुरावा
हे ठीक नाही || 1 ||
किती तूला सत्य
पुन्हा पुन्हा सांगू
खरं सांगतो तूला
अशी नकॊ वागू
संशय मनात उरावा
हे ठीक नाही
मागतेस प्रेमाचा पुरावा
हे ठीक नाही || 2 ||