STORYMIRROR

Pradnya Ghodke

Abstract

4  

Pradnya Ghodke

Abstract

हे श्वास ओढ घेत...!

हे श्वास ओढ घेत...!

1 min
42

घायाळ असती हे वृृृक्ष,

खिन्न गोठली उदासी..!

साचला ढिगारा पर्णांचा,

अन पाकळ्यांची निष्प्राण नक्षी...! १.


कोण अज्ञातात सारे,

उडून पक्षी गेले..!

गालावरूनी झरते आहे,

बाग अन फुललेली फुले...! २.


इथे चित्कार! प्राणांतिक,

स्तब्ध वचनांची समाधी घेत..

इथे भिणुन वार्‍याशी,

हे श्वास..ओढ घेत....!! ३.


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Abstract