Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!
Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!

Vaishnavi Kulkarni

Romance

3  

Vaishnavi Kulkarni

Romance

हे रोजचेच आहे

हे रोजचेच आहे

1 min
133


माझी प्रत्येक सकाळ

तुझ्या गोड स्मित हास्याने होणे

अन् माझे प्रसन्नतेने हसणे

हे रोजचेच आहे |


मी न बोलताही केवळ

माझ्या हावभावांवरून

तू मनातले ओळखणे

हे रोजचेच आहे ||


सकाळच्या घाई गडबडीत

बनवलेला स्वयंपाक देखील

चांगला झाला होता

याची तुझ्याकडून न चुकता

पावती मिळणे हे रोजचेच आहे |


दिवसभर आपापल्या व्यापांत

व्यस्त असलेल्या आपल्याला

गार गार कातरवेळी

आपले हक्काचे क्षण मिळणे

हे रोजचेच आहे ||


संसाराला सुरुवात करून

इतकी वर्ष झाली तरीही

एकमेकांची ह्रदये प्रीतकमलांनी

ओसंडून वाहणे

हे ही रोजचेच आहे ||


Rate this content
Log in

Similar marathi poem from Romance