STORYMIRROR

UMA PATIL

Classics

2  

UMA PATIL

Classics

हदय ( गझल )

हदय ( गझल )

1 min
500

मनी दुःख माझ्या किती साठलेले

हसू दाबता हुंदके दाटलेले


निसर्गास हिरव्या उमाळा फुटेना

असावेत बहुधा ऋतू गोठलेले


शिवावे कितीदा, शिवू मी कशाने ?

उसवते नव्याने गगन फाटलेले


दिला दक्षतेने पहारा तरी का ?

पिकांसोबतीनेच तण वाढलेले


हृदय भेट केव्हाच केले तुला मी

कसे सोडवू पूर्णतः गुंतलेले ?



Rate this content
Log in

Similar marathi poem from Classics